शिवळे महाविद्यालयात समुपदेशन केंद्राची स्थापना

जनसेवा शिक्षण मंडळ, मुरबाड, संचालित, शांतारामभाऊ घोलप कला,विज्ञान व गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय,शिवळे येथे महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरीता समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानसिक आरोग्य व कल्याणाबाबत करावयाच्या उपाययोजनांचे युजीसी दिल्लीने जे काही निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांचे मनोबल उंचावण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे लॉकडाऊनच्या काळात हे समुपदेशन केंद्र ऑनलाईन पध्दतीने महाविद्यालयात कार्यरत करण्यात आले आहे. गरजू विद्यार्थी व कर्मचारी यांचे फोनव्दारे व ऑनलाईन समुपदेशन करण्यात येणार आहे
या केंद्रामार्फत कोरोनाबाबतची माहिती, खबरदारी,उपाययोजना इत्यादीची माहिती व्हाट्सएप, फेसबुक ,व्हिडिओ कॉलिग व इतर समाज माध्यमातून कळवली जाणार आहे.तरी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी गरज भासल्यास महाविद्यालयाच्या या समुपदेशन केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एस.एम. पाटील(8169684112) यांनी केले आहे
या समुपदेशन केंद्रासाठी पुढील चार समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत
1) उपप्रचार्या डॉ. जी आर विशे( 8355963113)
2) प्रा विनोद पाटील (8975080275)
3) प्रा. सोपान यशवंतराव(7977925451)
4) प्रा. हेमांगी राणे(8605872737) यांचे संपर्कासाठी मोबाईल नंबर देण्यात आले आहेत.